यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यावतीने बारावी सायन्सच्या २०२३-२४ विद्यार्थ्यांसाठी शरद स्कॉलर परीक्षेचे आयोजन केले आहे. ही परीक्षा ४ एप्रिलला राज्यातील विविध जिल्ह्यांतील केंद्रावर होणार आहेत. यामध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला १ लाख रुपयांसह अनुक्रमे ५० हजार, ४० हजार, ३० हजार व २० हजार रुपये बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम विद्यार्थ्यास दहा हजार रुपये व इतर पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांचे बक्षीस आहे. परीक्षेसाठी नोंदणी करताना शुल्क पन्नास रुपये भरावे लागतील. ही परीक्षा ही बहुविकल्पीय असून, ७५ प्रश्न असतील. मॅथ्स २५ (५० गुण), फिजिक्स २५ (२५ गुण) केमिस्ट्री (२५ गुण) असतील. परीक्षा कोल्हापुरातील कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर, मुरगुड, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, गारगोटी, तर सांगली जिल्ह्यात सांगली, मिरज, म्हैशाळ, इस्लामपूर, जत व पलूस या केंद्रावर, सोलापूर, सांगोला, सातारा-कराड, पाटण, पुणे, रत्नागिरी, निपाणी, बेळगाव, या केंद्रांवर परीक्षा होणार आहेत.