इतिहासात पहिल्यांदाच उजनी गाठणार तळ…

उजनी धरण उणे ३६ टक्क्यांवर असून बाष्पीभवन, उजनी जलाशयातून शेतीसाठी उपसा व पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी आठ दिवसाला अंदाजे एक टीएमसी पाणी संपत आहे. आपल्याकडे जूनअखेर किंवा जुलैमध्ये पाऊस पडतो.

त्यामुळे यंदा उजनी धरण तयार झाल्यापासून पहिल्यांदाच उणे ७० टक्क्यांपर्यंत जाईल, अशी सद्य:स्थिती आहे. २०१५-१६ मध्ये धरण उणे ६० टक्के झाले होते. आता धरणाच्या बॅक वॉटरवरील पाणी उपशावर निर्बंध घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, सांगोला या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून उर्वरित तालुक्यांमध्ये देखील चिंताजनक स्थिती आहे. सध्या जिल्ह्यातील एकरूख, हिंगणी, जवळगाव, मांगी, आष्टी, बोरी व पिंपळगाव ढाळे या सात मध्यम प्रकल्पांमध्ये देखील सद्य:स्थितीत दीड टीएमसीपेक्षाही कमी पाणी आहे. उजनी धरण देखील तळ गाठत असून १५ मे दरम्यान सोलापूर शहरासाठी पुन्हा एकदा भीमा नदीतून सहा ते साडेसहा टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. बॅक वॉटरवरून आठ दिवसात एकदा एक टीएमसी पाणी संपत असल्याची सद्य:स्थिती आहे.