सोलापुरात शुकशुकाट…….

मराठा आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरिता आज मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी बंद पुकारला आहे. राज्यातील अनेक भागात बंद पुकारण्यात आला आहे. या भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळत असून शुकशुकाट पसरला आहे. तर, काही ठिकाणी मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं आहे.

दरम्यान, आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत, असं मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे. सोलापूर जिल्हातील माढा शहरात मराठा समाजाने बंद पुकारला आहे. बाजारपेठेतील दुकाने बंद ठेऊन शहरातील व्यापाऱ्यांकडून या बंदला चांगला प्रतिसाद देण्यात आला आहे. शासनाकडून सगे सोयरेच्या निर्णयाचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. याच मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार माढ्यात बंदला प्रतिसाद मिळाला आहे.