विशाल पाटलांचा निर्धार!

सांगलीच्या जागेवरून (Sangli Lok Sabha Election) आता महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता असल्याचं दिसतंय. मैत्रिपूर्ण असो वा शत्रुत्वाची लढत असो, मी सांगलीची निवडणूक लढणार असा निश्चय विशाल पाटील (Vishal Patil) यांनी केला आहे. तर पक्षाने आदेश दिला तर सांगलीमध्ये मैत्रिपूर्ण लढत दिली जाईल असं वक्तव्य काँग्रेसचे नेते विश्वजित कदम (Vishwajeet kadam) यांनी केलंय. सांगलीच्या जागेवर शिवसेनेने दावा करत परस्पर उमेदवार घोषित केल्यानंतर काँग्रेसचे नेते नाराज झाले असून त्यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. 

काँग्रेस हा जबाबदार पक्ष असून मित्रपक्षांसोबत चर्चा केल्याशिवाय परस्पर जागा जाहीर करत नाही. सांगलीची जागा ही काँग्रेसची परंपरागत जागा आहे. त्यामुळे मैत्रिपूर्ण लढत असो वा शत्रुत्वाची लढत असो, मी लढायला तयार आहे. पक्षाने जर आदेश दिला तर आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणारअसे विशाल पाटील  मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भेटीनंतर म्हणाले.