शेवटच्या टप्प्यात चंद्रहार पाटील यांची प्रचारात मुसंडी!

सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी घटकपक्षांचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी एकसंघ शक्तीने प्रचारात मुसंडी मारली.त्यामुळे मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे. घरभेटी, सभा बैठकांचा धडाका सुरू आहे. मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत, कडेगाव-खानापूर, आटपाडी आणि सांगली या सर्वच विधानसभा मतदारसंघांतून चंद्रहार पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.