राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा उत्साहात

कोरोची, राष्ट्रीय अवयवदान दिनाच्या निमित्त डॉ. शुभांगी प्रदीप पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या रचना शारीर विभागातर्फे अवयवदान जनजागृतीसाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत महाविद्यालयातील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 अवयवदान जीवनदान” हा मुख्य विषय ठेवून विद्यार्थ्यांनी आकर्षक रंगसंगती, प्रभावी घोषवाक्ये आणि संदेशप्रधान चित्रांद्वारे अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित केले. परीक्षकांनी सर्जनशीलता, संदेशाची परिणामकारकता आणि कलात्मकता या निकषांवर पोस्टरचे परीक्षण केले. पोस्टर स्पर्धेमध्ये तृप्ती चव्हाण आणि ग्रुप यांनी प्रथम, सुधा जाधव आणि ग्रुप यांनी द्वितीय तर प्रकाश वरक आणि ग्रुप यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

 डॉ. शुभांगी पाटील यांनी, एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकते, असे सांगितले. प्राचार्य डॉ. मुकुंद मोकाशी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. अतुल मानकर, डॉ. संदेश आरेकर, डॉ. रणजीत दिंडे पाटील, डॉ. दीप्ती मानकर, डॉ. सिमरन मुल्ला, शिल्पा बाहेती, डॉ. अमोल पाटील, डॉ. राहुल पोवार, डॉ. स्नेहा कोळी, व्यवस्थापक किशोर निकम आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले. आभार यश चव्हाण यांनी मानले.