प्रत्येक शनिवार, रविवार चाहत्यांना मेजवानी!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) फॅन पार्क 2024 च्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. याचे आयोजन भारतातील विविध राज्ये आणि शहरांमध्ये ७ एप्रिलनंतर होणार आहे.

बीसीसीआय IPL च्या 17 व्या हंगामात 50 टाटा आयपीएल फॅन पार्क 2024 चे आयोजन करण्याची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात 15 फॅन पार्कचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यापूर्वी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, बोर्डाने आयपीएल 2024 च्या पहिल्या 17 दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले होते. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने आयपीएल 2024 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले.

प्रत्येक वीकेंडला पाच वेगवेगळ्या शहरांमध्ये एकाच वेळी पाच फॅन पार्कचे आयोजन केले जाते. चाहत्यांना 13 आणि 14 एप्रिल रोजी कोल्हापूर, वारंगल, हमीरपूर, भोपाळ आणि राउरकेला येथील फॅन पार्कमध्ये आयपीएलचा आनंद घेता येणार आहे.

यादरम्यान पंजाब किंग्जचा सामना राजस्थान रॉयल्सशी, कोलकाता नाइट रायडर्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. सीझनचे अंतिम पाच फॅन पार्क 24 मे 2024 (क्वालिफायर 2) आणि 26 मे 2026 (फायनल) रोजी आग्रा, वडोदरा, तुमकूर, तेजपूर आणि गोवा येथे होणार आहेत.