पॅरिस ऑलंपिकमध्ये पदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र व आतंरराष्ट्रीय नेमबाज स्वप्निल कुसाळे याची काल बुधवारी भव्य स्वागत रॅली जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आली.यावेळी पोलिसांकडून पत्रकारांना अनपेक्षित धक्कादायक अनुभव आला.
प्राप्त माहितीनुसार थेट जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हेच कॅमेरामनच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला. पाठोपाठ त्यांच्या कनिष्ठ अधिका-याने जेष्ठ छायाचित्रकाराशी धक्काबुक्की केली. त्यामुळे संतप्त झालेल्या पत्रकारांनी आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याजवळ जिल्हापोलीस अधीक्षक यांच्यावर कारवाईची मागणी केली.
पत्रकारांशी पोलीस प्रशासनाकडून झालेल्या घटनेबाबत गृहमंत्री म्हणून जाहीर माफी मागत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनीही पत्रकारांशी गैरप्रकार करणाऱ्या कोणाही अधिकाऱ्याला पाठीशी घालणार नाही. त्यांचा मुलाहिजा बाळगणार नाही. त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल.,अशी ग्वाही यावेळी दिली.यावेळी बोलताना, पत्रकारांना कोणताही त्रास पोलिसांकडून होणार नाही.
याबाबत पोलिसांना कडक सूचना देण्यात येईल. तसेच पत्रकारांचे आयडेंटी कार्ड हीच त्यांची ओळख असेल अडवणूक केली जाणार नसल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले.