लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे घातक शस्त्रास्त्रे जवळ बाळगणे हा गुन्हा आहे. असे असताना इचलकरंजी कबनूर येथील पंचगंगा साखर कारखान्यानजीक दहशत माजविण्यासाठी तलवार घेऊन फिरणाऱ्या एका युवकावर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवम वायुकुमार कोळेकर (वय २४ रा. शिक्षक कॉलनी जवाहरनगर) असे त्याचे नांव आहे. त्याच्याकडून २०० रुपये किंमतीची तलवार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत पोकॉ विजय माळवदे यांनी फिर्याद दिली आहे.