इचलकरंजीत घरफाळा, पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र; पाच मिळकती सिल

सध्या प्रत्येक भागातील घरफाळा, पाणीपट्टी वसुली दणक्यात सुरु आहे. वेळोवेळी आदेश देऊनही याकडे अनेकजण दुर्लक्ष करीत राहतात. इचलकरंजी महानगरपालिकेने देखील घरफाळा, पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र केली आहे. आर्थिक वर्ष संपत आल्याने महापालिकेने थकबाकी वसुली मोहिम तीव्र केली आहे. यासाठी विविध पथकांची निर्मिती केली असून सोमवारी थकबाकीपोटी ५ मिळकती सिल करण्यात आल्या. नारिकांनी थकबाकी भरुन सहकार्य करावे, असे आवाहन सहा. कर संकलन अधिकारी यांनी केले आहे. बाळू केदारी शिंगाडे, श्रीपती गणपती जाधव, कृष्णा बाळा रेपे, कृष्णा गोविंद रेपे, दादू गणू शिरगुरे अशी मिळकती सिल केलेल्या थकबाकीदारांची नावे आहेत.