श्री राम नवमी हि १७ एप्रिल रोजी साजरी होणार आहे. त्यानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. तर आष्टा येथील झंवर कुटुंबीयांच्या श्रीराम मंदिरात श्री रामनवमी उत्सवाचे मंगळवार, दि. ९ ते बुधवार, दि. १७ एप्रिलअखेर अखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
दररोज पहाटे ६ ते ८ श्रींना अभिषेक व पूजा, सकाळी ८:३० ते १० पर्यंत प्रकाश महाजन व प्रमोद साळुंखे यांच्या कल्लेश्वर सत्संग मंडळाच्या वतीने वैदिक शांतिमंत्र, श्रीरामकथा बालकांड प्रवचन होणार आहे. तसेच दररोज सायंकाळी ७:३० ते ९:३० वासुदेवबुवा जोशी औदुंबर यांचे कीर्तन १५ रोजी सायंकाळी ४ ते ७ गीतरामायण, १७ रोजी दुपारी १२:३० वाजता श्रींचा जन्मकाळ व महाप्रसादाचे तसेच सायंकाळी पाच वाजता श्रींच्या पालखी सोहळ्याचे आयोजन केल्याची माहिती झंवर
कुटुंबीयांनी दिली. या विविध कार्यक्रमांसाठी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन झंवर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.