डॉ. राहुल आवाडे आमदार होणार शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांचा विश्वास…

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खूपच कमी वेळ शिल्लक राहिल्या कारणाने प्रत्येक मतदारसंघांमध्ये जोरदार मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे. इचलकरंजी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत आवाडे – माने गटाने मन आणि मतभेद विसरून काम केले. एक दिल्याने काम केले की यश निश्चित मिळते. आम्ही एकदा शब्द दिला की पाळतो त्यामुळे महायुतीचे उमेदवार डॉ
राहुल आवाडे आमदार होणार आमची गॅरंटी आहे असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी व्यक्त केला आहे.

कोकणातील शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराच्या धावपळीतून ते डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रचारात सक्रिय झाले. रवींद्र माने म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मी शिवसेना कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेतली. निवडणुकीचा आढाव घेतला. तर डॉ. राहुल आवाडे निवडून येण्यास कोणतीच अडचण दिसत नाही. लोकसभेला 40 हजारांचे मताधिक्य मिळालेले होते. या विधानसभा निवडणुकीत डॉ. राहुल आवाडे यांचे मताधिक्य नक्की वाढणार आहे यात तिळमात्रही शंका नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.