मौजे वडगांवमध्ये स्मशानभुमीत भानामतीचा प्रकार केल्याचे उघडकीस

मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथील स्मशानभुमीत भानामतीचा प्रकार केल्याचे उघडकीस आला आहे. स्मशानभुमीत लाल दोऱ्याने, लाल कापडात गुंडाळलेली काळी बाहुली आढळून आल्याने हे प्रकरण समोर आले.मृतदेह जाळण्यात येत असलेल्या लोखंडी जाळीत ही बाहुली आणि एका लिंबूला मोळे मारुन ठेवण्यात आल्याचे आढळून आले.

तसेच नारळ, हळद-कुंकू स्मशानात सर्वत्र टाकल्याने हे प्रकरण भानामतीचे असावे अशी चर्चा गावात सुरु आहे.स्मशानात अमावस्येच्या मुहूर्तावर अंधश्रद्धेपोटी काही तांत्रिक मांत्रिक अघोरी कृत्ये करत असतात. या घटना काही समाजासाठी नविन नाहीत. पण अशा घटनांनी समाजात भितीचे वातावरण निर्माण होते.

गत वर्षी ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान गावातील अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत होत्या. पण त्यावेळेस नागरिकांकडून या घटनेकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या चर्चा आहेत.