हातकणंगलेत वाढीव करवाढ विरोधात नागरिकांतून संताप

हातकणंगले नगरपंचायतिने अचानकपणे शहरातील मिळकत धारकांना वाढीव कराच्या नोटिसा दिल्याने हातकणंगले नगरपंचायत हद्दीतील मिळकत धारकांत नगरपंचायत विरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहेत. शासनाने दुष्काळ जाहीर करूनही ही नगरपंचायत करवाढ करत आहे नागरिकांकडे पैसेच नाहीत आम्ही करवाढ भरणार नाही असा इशारा करवाढ कृती समितीच्या वतीने माझी उपसभापती दीपक वाडकर यांनी इशारा दिला आहे.

हातकणंगलेत कर वाढविरोधी कृती समिती स्थापन झाली आहे. या कृती समितीने नगरपंचायतीच्या समोरच टेबल टाकून नागरिकांच्या हरकती घेण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी जवळपास 400 हरकती आल्या दुसऱ्या दिवशी 814 हरकती आल्या आहेत तर मंगळवारी बाराशे 50 तक्रारी आल्या. या सर्व तक्रारी कृती समितीच्या मार्फत हातकणंगले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना देण्यात येत होत्या पण त्यांनी घेण्यास टाळाटाळ करत कृती समितीच्या रेटामुळे त्यांनी स्वीकारल्या व त्यावर पोच दिल्या.

हातकणंगले नागरिकांकडून हुपरी शिरोळ यापूर्वीच्या म्हणजेच ग्रामपंचायत काळातील दराने कर आकारणी करत असताना हातकणंगले नगरपंचायतीला करवाढची घाई का असा सवाल मिळकत धारकांनी उपस्थित केला जात आहे.

वाढीव कराबद्दल हातकणंगले नगरपंचायतीणे 28 डिसेंबर पर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत दिली आहे. मात्र अनेक मिळकत धारकाना अद्यापी नोटीस मिळाल्या नसल्याने आलेल्या हरकतीमध्ये वाढ होणार असल्याचे कृती समितीने म्हटले आहे. त्यानंतर पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.