सध्या राज्यात सगळीकडेच गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिक अधिक सतर्क होत आहेत. परंतु ज्यांच्यावर आपल्या संरक्षणाची जबाबदारी ती म्हणजे खाकी वर्दी… पण याच खाकीकडून जेव्हा कायदा धाब्यावर बसवून दहशत माजवताततेव्हा लोकांचा खाकी वर्दीवरचा विश्वास उडतो. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या याचाच प्रत्यय येत आहे. कोल्हापूरच्या पाचगावातील एका पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या पदाचे कुठलेच भान न ठेवत हातात सुरा घेऊन पोलिसाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे याचा व्हिडीओ सध्य सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरासमोरील तरुण पत्नीकडे बघत असल्याच्या संशयावरून पोलीस कॉन्स्टेबलनं हातात सुरा घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूरच्या पाचगाव येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हातात सुरा घेऊन पोलिसाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. पोलीस कर्मचारी हातात सुरा घेऊन फिरतानाची दृश्य मोबाईलमध्ये कैद झाली आहे.
करवीर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल
ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे. संबंधित तरूण तक्रार करण्यासाठी करवीर पोलिस स्थानकात गेला. तरूणासोबत त्याची आई देखील होती. दिवसभर बसल्यानंतर सुरा घेऊन फिरणाऱ्या पोलिसाविरोधात करवीर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. यावरून मोठा वाद देखील केला. हा वाद झाला तेव्हा तरूणाच्या आईला चक्कर देखील आली. कायद्याच्या रक्षकांनी अशा प्रकारे दहशत माजवणे कितपत योग्य आहे, असा सवाल कोल्हापूरकर करत आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
घरासमोरील तरुण पत्नीकडे बघत असल्याच्या संशयावरून पोलिस कर्मचाऱ्याने हातात सुरा घेऊन फिरण्यास सुरूवात केली. तरूणाच्या घरासमोर आणि तो राहत असलेल्या गल्लीमध्ये हातात सुरू घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल. एवढच नाही तर तरूणाच्या घरासमोर छातीवर सुरा देखील आपटून घेत आहे. संबंधित तरुणाचे नातेवाईक देखील आहेत पोलीस दलात आहे. कायद्याच्या रक्षकांनी अशा प्रकारे दहशत माजवणे कितपत योग्य आहे, असा सवाल कोल्हापूरकर करत आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.