दिल्लीचा विजय अन् चेन्नईला सामना न खेळता फायदा……

आयपीएल 2024 मधील 26 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात खेळला गेला. लखनौच्या एकना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने घरच्या संघाचा म्हणजेच लखनौचा 6 विकेट्सने पराभव केला.

या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा बदल पाहायला मिळत आहे. दिल्लीने विजयासह झेप घेतली आहे, तर लखनौला मोठा फटका बसला आहे. लखनौविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्लीचा संघ तळाच्या म्हणजे 10व्या स्थानावर होता. आता दिल्ली 4 गुण आणि -0.975 च्या रन रेटसह नवव्या स्थानावर आली आहे. सामन्यापूर्वी लखनौ तिसऱ्या क्रमांकावर होता, जो आता चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. लखनौचे 6 गुण आहेत आणि नेट रनरेट +0.436 आहे.

आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेला राजस्थान रॉयल्स 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स 6-6 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. KKR चा नेट रनरेट +1.528 आणि चेन्नईचा +0.666 आहे.