वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर!

आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून नेतृत्त्वाची संधी रोहित शर्माला देण्यात आली आहे. रोहित शर्मानं पहिला टी-20 वर्ल्ड कप 2007 मध्ये खेळला होता. त्यातील तीन मॅचमध्ये त्यानं 88 धावा केल्या होत्या.मुंबईकर यशस्वी जयस्वालला देखील टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली आहे. तो रोहित शर्मासोबत डावाची सुरवात करु शकतो.विराट कोहलीला देखील टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली आहे.

विराट कोहली तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येण्याची शक्यता आहे.गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळं दूर असलेला भारताचा टी-20 स्पेशालिस्ट खेळाडू सूर्यकुमार यादवला देखील संधी मिळाली आहे. सूर्यकुमार यादवची मिस्टर 360 अशी देखील ओळख आहे. सूर्यकुमार यादवनं रोहितच्या गैरहजेरीत कॅप्टन म्हणून नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली होती.रिषभ पंतनं आयपीएलमध्ये दमदार कमबॅक केल्यानंतर त्याला आता टी-20 वर्ल्ड कपचं तिकीट मिळालं आहे.टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह ला संधी मिळाली आहे.

जसप्रीत बुमराह काही दिवसांपासून जखमी झाला होता.राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन म्हणून केलेल्या दमदार कामगिरीचा फायदा संजू सॅमसनला झाला असून त्याला टी-20 वर्ल्ड कपचं तिकीट मिळालं आहे.टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचं देखील कमबॅक झालं आहे. हार्दिक पांड्या सध्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व करतोय. मात्र, तिथं त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही.चेन्नई सुपर किंग्जच्या टीमकडून यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या शिवम दुबेला ऑलराऊंडर म्हणून संघात स्थान मिळालं आहे.भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा अर्शदीप सिंगवर असेल. अर्शदीप सिंग सध्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जच्या संघाकडून चांगली कामगिरी केलीय.

युजवेंद्र चहलनं आयपीएलमध्ये 200 विकेट घेतल्या असून यंदाच्या आयपीएलमध्ये त्यानं चांगली कामगिरी केलीय. या जोरावर त्यानं टी-20 वर्ल्डकपचं तिकीट मिळवलंय.टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाची संधी हुकणार अशी चर्चा होती मात्र निवड समितीनं जडेजावर विश्वास ठेवत त्याला संघात स्थान दिलं.कुलदीप यादवला तज्ज्ञ स्पिनर म्हणून संघात स्थान मिळालं आहे. दिलली कॅपिटल्सकडून खेळताना त्यानं चांगली कामगिरी केलीय.रवींद्र जडेजा, शिवम दुबे यांच्यानंतर तिसरा ऑलराऊंडर म्हणून अक्षर पटेलला संघात स्थान मिळालंय.

भारताच्या वेगवान गोलंदाजी ची धुरा जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंगसह मोहम्मद सिराजवर असेल.रिंकू सिंगला यंदाच्या आयपीएलमध्ये बॅटिंगची फारशी संधी मिळाली नाही. याचा फटका त्याला बसला असून त्याला राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे.शुभमन गिलला राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान मिळालं आहे. शुभमन गिलला यंदाच्या आयपीएलमधील खराब कामगिरीचा फटका बसलाय.आवेश खानला देखील राखीव खेळाडू म्हणून संधी मिळालीय.खलील अहमदला राखीव वेगवान बॉलर म्हणून संघात स्थान मिळाली आहे.