राजू शेट्टी यांनी आज विराट शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.संघटनेतील कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.दसरा चौकातून त्यांनी बैलगाडीने जात उमेदवारी अर्ज दाखल केला.तत्पूर्वी, जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह जयंत पाटील आणि सतेज पाटलांवर तोफ डागली.
खोक्याचा बाजार करणारी झुंड एका बाजूला माझ्या विरोधात उभी आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य माणसे , विचारवंत माझ्यासोबत असल्याचे ते म्हणाले.सगळे कारखानादार हातकणंगलेमध्ये काड्या करण्यात सामील असल्याचा आरोप त्यांनी केला.आधी उद्धव ठाकरे उमेदवार देणार नव्हते, पण चाव्या कोठून फिरल्या माहीत नाही, यामध्ये जयंत पाटील, सतेज पाटील असावेत, असा टोला त्यांनी लगावला.
विरोधकांतील काहीजण ईडीला घाबरून जातील भाजपत, पण ईडीला मी हिंगलत नाही, मला पाठवावी नोटीस एकदा, असे आव्हान त्यांनी दिले.ईडी कार्यालयावरच मोर्चा काढावा अशी परिस्थिती, असल्याचे ते म्हणाले.स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून यापुढी लढा विद्यार्थ्यांसाठी आणि बेरोजगारासाठी उभारणार असल्याचे ते म्हणाले.