रेंदाळ ग्रा.पं.च्या मासिक सभेवर सर्वच सदस्यांचा बहिष्कार

रेंदाळ ग्रामपंचायतीत मागील प्रोसेंडिग वाचून गावठाण वाढीव विस्तार बाबतीत ग्रामपंचायतीची अधिकृत परवानगी घेऊन आऊट करण्यास परवानगी दिली जावी या विषयावर सभागृहात चर्चा करण्याची सर्व सदस्यांची मागणी होती. या मागणीतून गोंधळ उडाला. सभागृहात अडीच तास वारंवार मागणी करूनही यांवर चर्चा न झाल्याने सर्वच सदस्यांनी मासिक सभेवर बहिष्कार टाकला. यातून सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत असल्याने रेंदाळ ग्रामपंचायतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले.ग्रामपंचायतीची मासिक सभा सरपंच सुप्रिया पाटील – इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होती. सभेत मागील प्रोसेंडिग वाचून कायम करणे या मागील विषयी स्पष्टीकरण मागितले.

शिक्षण सभापती रणजित खोत यांनी गावठाण सोडून ग्रामपंचायत हद्दीत ज्या-ज्या ठिकाणी नवीन वसाहती निर्माण होत आहेत. त्याकरिता त्यांनी रितसर परवानगी घेऊन कामकाज करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. मागील प्रोसेंडिगमधील संबंधित विषयाला स्थगिती नसताना स्थगिती कशी दिली ? असा प्रश्न उपस्थित करीत उत्तराची अपेक्षा व्यक्त केली. मात्र या मुद्यावर सरपंच बोलायला तयार नाहीत हे लक्षात येताच ठरावामध्ये चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला असल्याचे निदर्शनास आणून दिले. या विषयावर फोकस करीत सर्वच सदस्यांनी चर्चेची मागणी केली.

उपसरपंच अभिषेक पाटील यांनी, रस्ते गटारी, इतर पायाभूत नागरी सुविधा देताना होणाऱ्या कसरतींचा पाढा वाचला, यातून बहिष्काराचे उपसताच प्रभारी ग्रामसेवक प्रमोद मुसळे यांनी सभात्याग नावाच्या गोंडस नावाचा सल्ला दिला. मात्र अखेर सर्वच सदस्यांनी मनमानी कारभाराचा निषेध करीत सभात्याग केला. यामुळे पायाभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था व एकंदरीत गावची व्यवस्था यांसह अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चाच झाली नसल्याने अनेक विषय प्रलंबित राहिले यातून गावचे कामकाज रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.