महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकरांच्या यांच्या प्रचारासाठी आष्ट्यात महिला सरसावल्या आहेत. वाळवा पंचायत समि तीच्या माजी सभापती सौ. भाग्यश्री शिंदे यांच्या पुढाकाराने महिला मेळावा, महिलांच्या बैठका आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ महिला पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक आष्टा येथे सत्यजित पाटील यांच्या मातोश्री अनुराधा पाटील व वहिनी डॉ. धनश्री पाटील यांच्या उपस्थितीत झाली.
यावेळी भाग्यश्रीताई शिंदे म्हणाल्या, जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीची महाराष्ट्रभर घौडदौड सुरु आहे. हातकणंगले मतदार संघातही लोकसभा निवडणुकीत जनता कोणत्याही भूलथापांना बळी न पडता महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. वाढती महागाई, घरगुती गॅस सिलिंडरचे दर, कृषी मालावरील जीएसटी, वाढीव वीज मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा आपण प्रयत्न करूया.