हातकणंगले तालुक्यातील गंगानगर-कबनूर येथील ‘पंचगंगा’ संचालक मंडळ बरखास्त 

हातकणंगले तालुक्यातील गंगानगर-कबनूर येथील दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक मंडळ केंद्रीय सहकार निवडणूक आयोगाने बरखास्त केले आहे. आणि नव्याने निवडणूक कार्यक्रम घेण्याचे आदेश दिले आहेत. २९ एप्रिलला निवडणुक प्रक्रियेस प्रारंभ होणार असून ११ मे ला मतदान होणार आहे. या आदेशामुळे पी.एम. पाटील गटाला जबरदस्त धक्का बसला असून, रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या कन्या रजनीताई मगदूम यांना दिलासा मिळालेला आहे. ३ महिन्यापुर्वी पंचगंगा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती. दरम्यान रजनीताई मगदूम, अशोक पाटील, अण्णासाहेब शहापूरे यांच्यासह त्यांच्या गटाचे उमेदवारांचे अर्ज सुचक अनुमोदक यांचा ऊस आलेला नाही.

जनरल सभेला अनुपस्थिती आदी कारण दाखवत हे अर्ज बाद ठरवले होते. केंद्रीय सहकार कायद्यात अशी तरतुद नसल्याचे कारण देत केंद्रीय सहकार निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. या तक्रारीची दखल घेऊन तीन महिन्यापूर्वी झालेली निवडणूक बेकायदेशीर ठरवत संचालक मंडळ बरखास्त करून नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश केंद्रीय सहकार खात्याने दिले आहेत. त्यानुसार नविन निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पी. एम. पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे तर रजनीताई मगदूम गटाला दिलासा मिळाला आहे, अशी सभासदातून चर्चा आहे.

नवीन निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २९ एप्रिल २०२५ पासून १४ मे असा आहे. यामध्ये ५ एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, त्यानंतर छाननी, ६ एप्रिल माघार घेणे मुदत त्यानंतर अंतिम यादी जाहीर करणे. ११ मे रोजी मतदान, त्यानंतर १२ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर नूतन संचालक मंडळाची बैठक १९ मे रोजी होणार आहे.