राजू शेट्टींना रोखण्यासाठी सरकारची खेळी….

शेतकरी आंदोलनात गुन्हे दाखल असलेल्या जयसिंगपूर परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुमारे २०० कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यांना १५ एप्रिलला पोलिस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.याचा दिवशी माजी खासदार राजू शेट्टी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

दरम्यान, अर्ज भरण्यासाठी कार्यकर्ते जमू नयेत, यासाठी सरकारने षडयंत्र केल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला असून, कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्ते पोलिस ठाण्यात हजेरी लावणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. हातकणंगले मतदारसंघात बहुरंगी लढत होत असून, येथे माजी खासदार राजू शेट्टी व शिवसेनेचे धैर्यशील माने यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीविशेष लक्ष घातले आहे. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची होणार आहे. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूर परिसरातील सुमारे २०० कार्यकर्त्यांना पाेलिसांनी नोटिसा पाठविल्या आहेत. शेतकरी आंदोलनात गुन्हे दाखल असल्याने 15 एप्रिलला पोलिस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार राजू शेट्टी हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन होणार आहे. हे शक्तिप्रदर्शन होऊ नये म्हणून सरकारने खेळी केल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. शेट्टींनी म्हटले की, अर्ज भरण्यासाठी कार्यकर्ते जमू नये यासाठी सरकारने षडयंत्र रचले आहे.

कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात हजेरी लावणार नाहीत. सरकार आणि मुख्यमंत्री रडीचा डाव खेळत असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे. मात्र, मागील ऊस गळीत हंगामात कारखान्यांना दिलेल्या उसाचे पैसे घेतल्याशिवाय सरकार व कारखानदारांना सोडणार नसल्याचा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.