इस्लामपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीच्यावतीने सोमवार दि. १५ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता मोफत कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेत २०२४-२५ मध्ये होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, आगामी जिल्हा परिषद भरतीमध्ये आरोग्य भरती, तलाठी व ग्रामसेवक भरती, शिक्षक व पोलीस भरती तसेच अशा विविध खात्यांतर्गत भरती व सर्व सरळसेवा भरती परीक्षांच्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत परीक्षांचे तसेच २०२५ पासून बदलत्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा वर्णात्मक पॅटर्न यासंबंधात विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.
कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीत स्पर्धा परीक्षांचा दोन वर्षांचा पॅटर्न आहे. तसेच फाउंडेशन बेंच, रेग्युलर बॅच व स्टडी रूम बॅच अशा बॅचेस उपलब्ध आहेत. अल्पावधीतच या प्रबोधिनीचा कर्मवीर स्पर्धा परीक्षा पॅटर्न नावलौकिकास आला आहे. २००३ पासून आतपर्यंत ९६४ पेक्षा जास्त विद्यार्थी अधिकारी पदावर कार्यरत असून सन २०२३ २४ यावर्षी २०५ विद्यार्थ्यांची अधिकारी पदावर निवड झाली आहे.
प्रबोधिनीमध्ये डिजीटल क्लासरूम, अद्ययावत ई-ग्रंथालय, रेग्युलर टेस्ट सिरीज, पेपर रिडींग रूम, नेट कॅफे, स्वतंत्र अभ्यासिका तसेच त्या-त्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांचेही मार्गदर्शन मिळत असल्याने विद्यार्थ्यांना अधिकच फायदा होतो. या कार्यशाळेस केंद्र संचालक प्रा. अजितकुमार पाटील हे मार्गदर्शन करणार असून कार्यशाळेचा विद्यार्थ्यांनी व पालकांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन केले आहे.