‘भारताची C टीमदेखील पाकिस्तानला हरवेल..’ भारतीय क्रिकेटपटूचं सडेतोड उत्तर

वर्ल्ड कप 2023 ची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. विश्वचषकातील 12 वा सामना हा 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झाला. पाकिस्तानवर भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. या विजयासोबत भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेच्या पॉइंट टेबलवर 6 पॉइंटसोबत पहिल्या क्रमांकावर आहे. भारत पाकिस्तान सामन्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी विविध वक्तव्य केलं पण त्यात पाकिस्तान कोचचं वक्तव्याने वादळ उठलं आहे. त्यांच्या वक्तव्याने भारतीय संघासोबत भारतीय चाहते नाराज झाले आहेत.

‘भारताची C टीमदेखील पाकिस्तानला हरवेल..’

पाकिस्तान कोच मिकी आर्थरच्या वक्तव्यावर भारतीय क्रिकेटपटू श्रीशांतने सडेतोड उत्तर दिलं आहे. तो म्हणाला की, ”तुम्हाला फाइनलमध्ये बघावं लागणार नाही. मला नाही वाटत की पाकिस्तानची टीम कधी भारतीय संघाला वर्ल्ड कपमध्ये हरवू शकेल. सध्या पाकिस्तानची टीम जशी आहे, त्यानंतर तर कधीच हरवू शकणार नाही. आमची C टीमदेखील पाकिस्तान टीमला पराभूत करेल. तुम्ही आयपीअल प्लेइंग XI ची अशी टीम बनवा जी सध्या कुठेही खेळत नाही. तेही पाकिस्तानचा सहज पराभव करेल.” 

मिकी आर्थर नेमकं काय म्हणाले होते?

भारत पाकिस्तान सामन्यानंतर मिकी आर्थर म्हणाले होती की, भारतीय संघ खूप चांगला आहे. मला वाटतं की, राहुल द्रविड आणि रोहित शर्मा संघाचे नेतृत्तव चांगले करत आहे. मी फायनलमध्ये त्यांना पुन्हा भेटण्यासाठी उत्सुक आहे.

‘BCCI चा कार्यक्रम वाटतो’

पुढे ते असंही म्हणाले की, ” प्रामाणिकपणे सांगायचं तर भारत पाकिस्तानचा सामना हा अजिबात आयसीसीच्या कार्यक्रमासारखा वाटत नाही. जणू काही हा द्विपक्षीय मालिकेचा सामना खेळजा जात होता, असं वाटलं. खरं तर हे सगळं बीसीसीआयने आयोजन केल्यासारखं वाटत होतं. मला मायक्रोफोनवरुन एकदाही ‘दिल दिल पाकिस्तान’ ऐकायला मिळालं नाही. या गोष्टींचा सामन्याच्या निकालावर परिणाम होतो पण मला ते निमित्त म्हणून वापरायला आवडणार नाही.”