आटपाडी तालुक्यात पाणी टंचाई! टँकरने पाणी पुरवठा

अलीकडे उन्हाची तीव्र टंचाई जाणवत आहे.आपल्या सर्वांना माहितच आहे की आटपाडी तालुक्यात पाणी टंचाई देखील खूपच जाणवते. आटपाडी तालुक्यातील वाड्या वस्त्यांवरती पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू असून नागरिकांच्या मागणीनुसार पाणी टँकर सुरू करून दुष्काळवर मात करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्यासह त्यांच्या शिष्टमंडळानी प्रशासनाकडे केली आहे.

सदर आढावा बैठक पंचायत समिती गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळर यांच्या दालनात करण्यात आली.
तालुक्यात काही भागत टँकरने पाणी पुरवठा केला जात असून टँकरच्या खेपा वेळेवर पोहचत नसल्याने नागरिकांचे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. टँकर वेळेवर पोहोचावेत अशी मागणी होत आहे.

काही भागात नागरिकांची मागणीनुसार त्याभागत टँकर सुरू करावेत. तसेच प्रशासनाने पाण्यासंदर्भात स्वतंत्र कक्ष सुरू करावाव इतर पिण्याच्या पाण्याबाबत उपाय योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी जि. प. माजी सदस्य अरूण बालटे, ज्येष्ठ नेते श्रीरंग कदम, हरिदास पवार, नवनाथ कदम, सयाजी मोरे, वाचन चळवळीचे दिनेश देशमुख उपस्थित होते.