शासनाकडून अनेक नवनवीन सरकारी योजना राबविल्या जात आहेत. जेणेकरून त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना पुरेपूर लाभ होईल. घरकुल योजना सध्या खूपच गाजावाजा करत आहे. अनेकांना घरकुल योजना मंजूर झालेली आहे. आटपाडी पंचायत समिती आटपाडी मध्ये दि २३ रोजी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक २ अंतर्गत पंचायत समिती अंतर्गत एकुण २३०० लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व २०४९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण समारंभ गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा पार पडला.
आटपाडी गटविकास गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांनी लाभार्थांना घरकुल त्वरित पुर्ण करण्यासंदर्भात सुचना व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास संतोष कदम विस्तार अधिकारी सांख्यिकी लाभार्थ्यांना योजने संदर्भात मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास मगदुम विस्तार अधिकारी पंचायत सचिन पाटील व सहा, प्रवीण जवळे डाटा ऑपरेटर, कन्हैया देशमुख (ग्रा. गृ. अभि) यमगर बचत गट कांबळे यावेळी उपस्थित होते.