लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024 ) उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे. सोमवारी ( 15 एप्रिल ) कोल्हापूर ( Kolhapur Lok Sabha Election 2024 ) आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.शिवाय हातकणंगलेमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नेते, माजी खासदार राजू शेट्टी ( Raju Shetti ) यांनी देखील अर्ज दाखल केला आहे.
तर, वंचितचे डी.सी पाटील यांनी 12 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी शाहू महाराज छत्रपती हे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर हे आपल्या निवडक कार्यकर्त्यांना घेऊन साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
कोणतीही शक्ती प्रदर्शन न करता केवळ निवडक 500 ते 1000 कार्यकर्त्यांना घेऊन ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सत्यजित पाटील सरूडकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.
