रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत. त्यांची संपत्ती 116 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. पेट्रोकेमिकलपासून ते ग्रीन एनर्जीपर्यंत विविध उद्योगात ते आहेत. तसेच टेलीकॉम, मीडिया एंटरटेनमेंटमध्ये रिलायन्स कार्यरत आहे. मुकेश अंबानी यांनी बीसीसीआयकडून आयपीएलचे हक्क मिळवले. त्यानंतर जिओ सिनेमामार्फत आयपीएल मोफत दाखवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमी ‘खूश’ झाले.
परंतु या निर्णयाचा फायदा मुकेश अंबानी यांनाही होत आहे. मुकेश अंबानी यांनी वायकॉम18 च्या माध्यमातून पाच वर्षांसाठी आयपीएलचे डिजिटलचे हक्क मिळवले. तब्बल 23 हजार 758 कोटी रुपयांत हे हक्क त्यांनी घेतले आहे. म्हणजेच दरवर्षी त्यांना 4 हजार 750 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे. परंतु इतकी रक्कम खर्च करुन ते आयपीएल मोफत दाखवत आहेत. मग मुकेश अंबानी यांचा काय प्लॅन आहे, मोफत सामने दाखवून ते कसे लाभ मिळवत आहेत. खरंतर मुकेश अंबानी शॉर्ट टर्म ऐवजी लॉग टर्म फायद्याचा विचार करतात, हे यामधून समोर आले आहे.जिओ सिनेमावर फ्री मॅच दाखवून मुकेश अंबानी यांना नुकसान होत नाही. ते कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत.
आयपीएल मॅच दरम्यान फक्त फक्त जाहिरातीमधून चार हजार कोटींपेक्षा अधिक कमाई त्यांना होत आहे. त्यांनी दूरदृष्टी ठेऊन जाहिरातीचे दर कमी ठेवले आहे. यामुळे दीर्घकाळपर्यंत जाहिरातदार त्यांच्यासोबत असणार आहे. मागील वर्षी त्यांना फक्त जाहिरातमधून 3239 कोटी रुपयांची कमाई झाली होती. यावर्षी ती 4 हजार कोटी रुपयांवर जाणार आहे.