देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाला वळण देणारी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून, अवघ्या काही तासांतच या निवडणुकीअंतर्गत पहिल्या टप्प्य़ातील मतदान पार पडणार आहे. सध्या सर्वत्र या टप्प्याच्या अनुषंगानं अखेरच्या क्षणी प्रचारसभा सुरु असून, बुधवारी सायंकाळपर्यंत सर्व पक्षांचा प्रचार थांबणार आहे. ज्यानंतर शुक्रवार, 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडेल. महाराष्ट्रात या टप्प्यात नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघात मतदान होणार आहे.
19 एप्रिलला होणाऱ्या या मतदानामध्ये पाच जागांसाठी लढत पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये काही तुल्यबळ लढती होणार असून, मतदारांचा कल कोणाकडे असेल हीसुद्धा परीक्षा नेत्यांना द्यावी लागणार आहे.