आटपाडी तालुक्यातील विवाहितेवर बलात्कार

अलीकडे गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. महिलांवर अत्याचार प्रकरणे देखील खूपच वाढत आहेत. आटपाडी तालुक्यातील एका गावातील विवाहितेशी मैत्री करून गणेश दत्ता बंडगर (रा. आंबेवाडी) याने एक वर्षापूर्वी तिच्यावर बलात्कार केला. यावेळी संशयित गणेशने या महिलेचे फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी केली.

पीडित महिलेने नकार देताच त्याने तिच्या पतीला देखील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. एक वर्षापूर्वी हा गुन्हा घडल्यानंत फिर्यादीच्या घरच्यांनी आतापर्यंत दोन वेळा संशयितास समजावुन सांगितले होते. परंतु संशयिताने पुन्हा फिर्यादीच्या पतीस १३ एप्रिल रोजी समक्ष आणि १४ एप्रिल रोजी फोनद्वारे तुझ्या बायकोचे व माझे खाजगी क्षणाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तपास उपनिरीक्षक केंद्रे करत आहेत.