सावधान! अरबी समुद्रात येणार ‘तेज चक्रीवादळ; मुंबईला आस्मानी संकटाचा धोका?

राजधानी मुंबईवर अस्मानी संकट घोंघावत असल्याचा धोका हवामान खात्याने वर्तवला आहे. अरबी समुद्रात येत्या २१ ऑक्टोबर रोजी ‘तेज’ हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या चक्रिवादळाचा परिणाम मुंबईतही जाणवण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राजधानी मुंबईला चक्रीवादळाचा धोका….

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यभरात पावसाने विश्रांती घेतली असून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली आहे. मात्र मान्सून परतीच्या वाटेवर असतानाच अरबी समुद्रात कमी दाबाचे श्रेत्र निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अरबी समुद्रातील या हवेच्या दबावामुळे मुंबई शहरात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तसेच शहरात वेगाने वारे आणि मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे. या चक्रीवादळाचा समुद्रसमाटीपासून ३.१ किमी उंचीपर्यंत प्रभाव दिसून येत आहे.

काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ ऑक्टोबरपर्यंत मध्य अरबी समुद्रावर हवेचा दबाव अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे मध्य आणि दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे आणि कोमोरिन क्षेत्रात कमी ते मध्यम स्वरूपाचे विखुरलेल्या स्वरूपातील ढग तयार होत आहेत. त्यामुळेच देशाच्या दोन्ही किनारपट्ट्यांवर चक्रीवादळं निर्माण झाल्यास ती पुढील 9 दिवसांमध्ये धडक देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.