केंद्र सरकारच्या “स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.०” च्या धर्तीवर राज्यामध्ये सुद्धा स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० राबविण्यात येत आहे.याअंतर्गत राज्यातील सर्व शहरे कचरामुक्त करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
शिवाय शहरातील सर्व प्रकारच्या घन कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, शाश्वत स्वच्छ ता आणि वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करणे या गोष्टींचा समाविष्ट आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत विटा पालिकेला वापरलेले पाणी व्यवस्थापन (STP) प्रकल्पाला राज्य शासनाकडून तब्बल १४ कोटी ९३ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यामुळे अनेक दिवसांपासूनच्या विटेकरांच्या मागणीला यश आले आहे.
विट्यात वापरलेले पाणी पुन्हा प्रक्रिया करून शुद्ध केले जावे अशी अनेक वर्षांपासूनची येथी ल लोकांची मागणी होती. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा एकत्रित हिस्सा असणार आहे.