उद्या संजयकाका पाटील अर्ज करणार दाखल

खासदार संजयकाका पाटील हे उद्या म्हणजेच गुरुवारी १८ एप्रिल ला उमेदवारी दाखल करणार आहेत. भारतीय जनता पार्टीचे सांगली लोकसभा मतदार संघातील उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांचा उमेदवारी अर्ज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच महायुतीतील प्रमुख नेत्याच्या उपस्थितीत उद्या गुरुवार दि. १८ एप्रिल रोजी दाखल करण्यात येणार आहे.

या दिवशी भव्य रॅलीने शक्ती प्रदर्शन होणार असून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाभरातून हजारो कार्यकर्ते गर्दी करणार आहेत अशी माहिती संजयकाका पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली.

खासदार संजयकाका पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मोठी तयारी सुरु आहे. भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते येणार आहेत. दुपारी २ वाजता सांगलीतील पुष्पराज चौक येथून भव्य रॅली होणार आहे. मतदार संघाच्या सर्व भागातून कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने येणार असल्याने प्रचंड गर्दीत शक्ती प्रदर्शन होणार आहे. दुपारी २.३० वाजता स्टेशन चौक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.