नागपूर येथे उद्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. महायुतीचं सरकार राज्यात दुसऱ्यांदा स्थापन झाले असून मात्र अद्याप महायुतीमध्ये खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही.तर दुसरीकडे यंदा हिवाळी अधिवेश विरोधी पक्षनेते विना होणार का? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. जर हिवाळी अधिवेश विरोधी पक्षनेते विना झाला तर महायुतीसमोर महाविकास आघाडीचा टिकावं लागेल का याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
हिवाळी अधिवेशनात राज्यपाल अभिभाषण, अंतिम आठवडा, पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि औचित्याचे मुद्द्यांवर कामकाज होईल तर राज्यात उडालेला कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, परभणीमधील हिंसाचार, बेस्ट बस अपघातावरून विरोधक सरकारला घेरण्याची तयारी करत आहे.एका आठवड्याच्या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील संविधान प्रतिकृतीची विटंबनामुळे परभणीत उसळलेला हिंसाचार आणि आंबेडकरी अनुयायींवर पोलिसांनी केलेली कारवाई, बीड जिल्ह्यात सरपंचांची झालेली हत्या, कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातानंतर कंत्राटी कामकार भरतीवर निर्माण झालेला प्रश्न, शेतकऱ्यांना जाहीर कर्जमाफी, वाढीव कृषीवीज बिलाचा मुद्दा यावरून सरकारला विरोधक घेरणार.