उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अशी घ्या काळजी……….

अलीकडे तापमानाचा पारा वेगानं वाढत आहे. हे असंच सुरू राहिल्यास गंभीर परिस्थिती आणि समस्यांना तोंड द्यावं लागेल. पण यावर्षी अत्यंत उष्णता आहे. राज्यात उच्च तापमान नोंदवलं गेलं आहे. बाहेर जाताना आपल्याला स्वतःची खूप काळजी घेणं आवश्यक आहे. काळजी घेण्यात हलगर्जीपणा केल्यानं जीवनशैलीवर दुरोगामी परिमाण होऊ शकतात.

तसंच वृद्ध, मधुमेह, मूत्रपिंड, अर्धांगवायू, हृदयरोग रुग्णांनी या दिवसात विशेष काळजी घ्यावी. तापमान वाढीमुळे शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. सुरुवातीला अगदी साधारण वाटणारी लक्षणं जर वेळेत आपण ओळखली नाही तर गंभीर स्वरूप धारण करू शकतात.

उष्माघाताची लक्षणं

उच्च तापमान, मळमळणं, उलट्या होणं, भूक एकदम मंदावणं, पाण्याचा अभाव/तहान लागणं, घाम येणं, श्वास लागणं, गंभीर, डोकेदुखी, सततची चिडचिड, त्वचेवर लालसरपणा, तोंडाला कोरड पडणं, श्वास घेण्यात अडथळा, अस्वस्थता जाणवणं, लघवी कमी होणं, लघवीच्या जागी जळजळ

उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

भरपूर पाणी, द्रव्य पदार्थ, फळांचा रस घ्या. स्वत:ला हायड्रेट ठेवा. शक्य असल्यास दररोज तीन ते चार लीटर पाणी प्या. घट्ट कपडे वापरणं टाळा. फिक्या रंगाचे कपडे घालण्यास प्राधान्य द्या. दिवसा शक्यतो घरातच राहणं पसंत करा. दुपारी उन्हात बाहेर पडणं शक्यतो टाळा. बाहेर जात असताना सनस्क्रीन लोशन लावूनच जा. बाहेर जाताना डोक्यावर टोपी किंवा काहीतरी बांधावं.
गरज असेल तेव्हाच बाहेर पडा. मूत्रपिंड रुग्णांनी सावध असणं आवश्यक आहे.

सामान्य लोकांच्या तुलनेत, मूत्रपिंडाचे आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. फळं, फळांचे रस, नारळ पाणी, लिंबू पाणी, इत्यादी घेऊ नये. काहीवेळा उच्च रक्तदाबाची औषधं शरीरातील पाणी आणि सोडियम यांचं प्रमाण कमी करतं. ज्याने आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी उन्हाळ्यात या औषधाचा वापर करू नये. कारण या औषधांनी व्यक्तींना उष्माघाताचा धोका उद्भवू शकतो. मूत्रपिंडाचे आजार असलेल्या रुग्णांनी उन्हाळ्यात औषधोपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.