पावसाने जनतेला दिलासा!

गेल्या काही दिवसापासून उष्णतेच्या झळा खूपच बसत होत्या. वाळवा शहरासह परिसरात सुमारे तासभराहुन अधिक काळ अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. रोजच्या वाढत्या तापमानाने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. बुधवारी सायंकाळी ६ सुमारास अचानक बरसलेल्या वळीवाच्या पावसाने वाळवेकरांना दिलासा मिळाला.
गेल्या आठवडा भरापासून उष्णतेचा पारा वाढल्याने अंगाची काहीली होऊन घामाच्या धारा वाहणाऱ्या उष्णतेने जनजीवन हैराण होते. बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास वादळीवारे, ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह वळीवाचे आगमन झाले. सुमारे तासभर धुवांधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.