वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) श्री जोतिबा देवाच्या मूर्तीचे संवर्धनाचे काम पुढे ढकलल्याने जोतिबा देवांचे दर्शन आजपासून नियमितपणे सुरु राहणार आहे. ही माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी दिली.पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक कार्यालयातर्फे ७ ते ११ जुलै या कालावधीत देवाच्या मूर्ती संवर्धनाचे काम केले जाणार होते. मात्र या संदर्भात जोतिबा डोंगरावरील सर्व श्रीपूजकांची बैठक झाली
. त्यामध्ये देवाची श्रावण षष्ठी यात्रा १० ऑगस्ट रोजी होत आहे. या यात्रेसाठी श्रीपूजकांना काही दिवस अगोदर तयारी करावी लागते. त्याचा विचार करुन मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलण्यात यावे, अशी विनंती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली होती. त्यांच्या विनंतीचा विचार करुन संवर्धनाचे काम पुढे ढकलले आहे. त्यामुळे जोतिबांचे दर्शन नियमितपणे सुरु राहणार आहे.