इचलकरंजीत रविवारी महावीर जयंतीनिमित्त कार्यक्रम

इचलकरंजी येथील भगवान महावीर जयंती उत्सव मंडळ, सकल जैन समाजातर्फे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. रविवारी २१ एप्रिलला मुख्य कार्यक्रम आहे.यादिवशी आदिनाथ जैन मंदिर, गावभाग येथून प्रभात फेरी आयोजित केली आहे. जैन बोर्डिंग येथील चंद्रप्रभू जैन मंदिर येथे सकाळी आठ वाजता ध्वजवंदन होईल. सकाळी नऊ ते एक या वेळेत खंडेलवाल भवन, वर्धमान त्यागी भवन येथे रक्तदान शिबिर होईल.

सकाळी साडेनऊ वाजता बाहुबली येथील वृद्धाश्रमास शिधावाटप, टीबी क्लिनिक येथील रुग्णांना दूध व बिस्कीट वाटप होईल. सकाळी ११ वाजता शिवतीर्थजवळ असलेल्या आनंदगुरु चपाती भाजी सेवा केंद्र येथे मिष्टान्न भोजनाचे वाटप होईल. जैन धर्मीय विषयावर व समाज प्रबोधनात्मक देखावा स्पर्धा आयोजीत केली आहे. दुपारी तीन वाजता श्री १००८ भगवान महावीर रथोत्सव सुरू होईल. याबाबतची माहिती उत्सव मंडळाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील व सचिव उदय चौगुले यांनी दिली.