स्वराज्य पक्ष संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा आज रविवारी ( 11 फेब्रुवारी ) वाढदिवस आहे. हा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.
मुंबई, नाशिक,पुणे, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणावरून स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते कोल्हापुरात दाखल झाले आहेत. संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात विविध कार्यक्रम भरवले आहेत.
त्यातच नाशिकहून कोल्हापुरात आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या कारवर लावलेले पोस्टर चर्चेत आले आहेत. या कार्यकर्त्यांनी कारवर संभाजीराजे छत्रपती ‘भावी मुख्यमंत्री’ असं पोस्टर लावले आहेत. या पोस्टरची राजकीय वर्तुळात आणि कोल्हापुरात चर्चा सुरू झाली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून झळकले पोस्टर
