शाहिरी व लोककला अकादमी आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्र प्रेमाची व राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण व्हावी आणि आपल्या पारंपारिक लोकगीतांची ओळख व्हावी या हेतूने २० ते ३० एप्रिल या कालावधीत शाहिरी कला प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. दररोज सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हे शिबीर सोनीदेवी बाहेती रोटरी क्लब कागवाडे मळा येथे आयोजित केले आहे.
या शिबिरात पोवाडे, समाज प्रबोधनपर गीते, लोकगीते यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा. सदरचे शिबिर हे विनामूल्य असून किमान पाचवी उत्तीर्ण असणाऱ्यांना या शिबिरात भाग घेता येईल. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. ज्यांना या शिबिरात सहभागी व्हायचे आहे. आपली नावे नोंदणी करावी, असे आवाहन शाहिरी व लोककला अकादमीचे अध्यक्ष शाहीर विजय जगताप यांनी केले आहे