इचलकरंजी ,येथील भोने माळ परिसरातील ऑटोलूम कारखान्याला शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत तीन रॅपिअर लूमसह कारखान्यातील इतर साहित्य जळून सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले. आग विझविण्यासाठी अग्निशामक दल सुमारे तासभर प्रयत्न करीत होते. याबाबत मुरलीधर दामोदर सातपुते (वय ४५, रा. जवाहरनगर) यांनी शिवाजीनगर पोलिसात वर्दी दिली आहे.
याबाबत घटनास्थळावरून तसेच पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, जवाहरनगर मध्ये राहणारे मुरलीधर
सातपुते यांचा भोनेमाळमध्ये ऑटोलूमचा कारखाना आहे. शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास (पान २ वर)
याबाबत घटनास्थळावरून तसेच पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, जवाहरनगर मध्ये राहणारे मुरलीधर
सातपुते यांचा भोनेमाळमध्ये ऑटोलूमचा कारखाना आहे. शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास अचानक सदर कारखान्याला आग लागली.
आगीची माहिती समजतात कारखान्यातील अग्निरोधक सहाय्याने कामगारांनी आग | विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वाढतच गेली. त्यामुळे घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आग विझविताना अडथळा येत असल्याने कारखान्याची पत्रे फोडून सुमारे तासभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीमध्ये ३६ लाख रुपये किमतीचे तीन रॅपिअर लूम, कारखान्यातील सूत, बीम, वायरिंग, डिस्प्ले बोर्ड, इलेक्ट्रिक बोर्ड आदी साहित्य जळून खाक झाले. त्यामध्ये सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची वर्दी मुरलीधर सातपुते यांनी दिली असून या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे.