अजित पवार यांनी केली विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका!

महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन तिढा वाढला आहे, तर महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संजयकाका पाटील यांनी आज सांगलीत शक्तिप्रदर्शन करत जाहीर सभा घेतली.

या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी सभेत बोलताना अजित पवार यांनी काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. मागच्या काळामध्ये ज्यांनी साखर कारखाने चांगले काढले, वसंतदादांनीही साखर कारखाना चांगला काढला. त्या कारखान्याचं वाटोळ कुणी केलं, आज तुम्ही दुसऱ्याला चालवायला कारखाने देता.

साखर कारखाना चालवायची तुमच्यामध्ये धमक नाही.आम्ही साखर कारखाने चांगले चालवून दाखवतो, बँकांचं काय केलं? आज काय परिस्थिती आहे, अशी टीका अजित पवार यांनी विशाल पाटील यांच्यावर केली.