अभिनेता आमिर खान पाठोपाठ आता रणवीर सिंहने देखील पोलिसांत धाव घेतली आहे. रणवीर सिंहचा एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्याने कायदेशीर पावले उचलत सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत एफआयआर नोंदवला आहे.
आतापर्यंत अनेक फिल्म स्टार डीपफेक व्हिडिओचे बळी ठरले आहेत. अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, अभिनेता आमिर खाननंतर आता रणवीर सिंगचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. देशभरात निवडणुकीची धामधूम सुरू असताना रणवीर सिंहचा राजकीय भाष्य करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये रणवीर एका राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसत असल्याचे दिसून आले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यामूत तयार करण्यात आलेल्या या डीपफेक व्हिडीओविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.