शुक्रवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईचा यंदाच्या सिझनमधील हा आठवा पराभव होता. दरम्यान या सामन्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सवर चिटींगचा आरोप करण्यात येतोय. हा चिटींगचा आरोप पुन्हा एकदा टॉसच्या मुद्द्यावरून झाल्याचं दिसून आलं आहे. यापूर्वी देखील पंड्यावर असा आरोप करण्यात आला होता.
दरम्यान केकेआर विरूद्धच्या सामन्यानंतर यानंतर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जातंय. यावेळी केवळ मुंबई इंडियन्सच नाही तर संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याही मैदानाच चिटींग करतो असा आरोप करण्यात येतोय.शुक्रवारी झालेल्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर टॉससाठी मैदानावर उपस्थित होते.
त्यावेळी हार्दिक पंड्याने टॉससाठी नाणं उडवलं. त्यावेळी नाणं खाली पडल्यानंतर त्याचा निकाल कॅमेरात दाखवण्यापूर्वी रेफरींनी मुंबईला विजयी घोषित केलं. दरम्यान या घटनेनंतर सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स फ्रँचायझीला चिटर म्हणत ट्रोल केलं जातंय.