हनुमान जन्मोत्सवानिमित्त चंदूरमध्ये उद्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!

उद्या हनुमान जयंती सर्वत्र साजरी होणार आहे. त्यामुळे गावागावात हनुमान मंदिरामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
चंदुर (ता. हातकणंगले) येथील हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार ता. २३ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

या सोहळ्यासाठी हनुमान मंदिराची साफसफाई व आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे ५ वाजता श्री मूर्तीस अभिषेक व महापूजा, नाम जप होणार आहे. सकाळी सहा वाजता हनुमान जन्म सोहळा, दुपारी भजन व नाम संकीर्तन होणार आहे. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी चंदुर व परिसरातील सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन हनुमान जन्मोत्सव उत्सव कमिटीने केले आहे.