काही महिन्यांवरच विधानसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे. अशातच नेते मंडळींची हालचाली सुरू देखील झालेल्या आहेत. उमेदवारी बाबतीत तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच हातकणंगले नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीच्या हालचाली गतिमान झालेल्या दिसून येत आहेत. 11 ऑगस्टला मतदान यासाठी होणार आहे.परंतु सर्वपक्षीय एकच उमेदवार देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.
या चर्चेतून स्वर्गीय नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांच्या पत्नी श्रीमती अर्चना जानवेकर यांच्या नावावर एकमत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर जानवेकर यांना बिनविरोध निवडून द्या अशी भूमिका ग्रामस्थांनी ही मांडली आहे.
नगराध्यक्ष म्हणून काँग्रेसचे अरुणकुमार जानवेकर निवडून आले होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांच्या रिक्त जागेवर ही निवडणूक लागली आहे. 11 ऑगस्टला मतदान आहे
केवळ सहा महिनेच कार्यकाळ राहिल्यामुळे आणि तोंडावर विधानसभा निवडणूक असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी सावध हालचाली सुरू देखील केलेल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय उमेदवार हा पर्याय पुढे आलेला आहे. जानवेकर समर्थकांनी नुकतीच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश पाटील यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. यावेळी पाटील यांनी सर्वपक्षीय प्रस्ताव आल्यास विचार करू असे सांगितले असे समजते.