मे महिन्यात एकूण 11 दिवस बँका राहणार बंद!

लवकरच नव्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या महिन्याला सुरुवात होत आहे. आगामी मे महिन्यात एकूण 11 दिवस बँका बंद असतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केल्यानुसार बँकांना 11 दिवस सुट्टी (Bank Holiday List) असणार आहे. यामध्ये आठवड्याची सुट्टी, दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवारचा समावेश आहे. 

आगामी मे महिन्यात अनेक सण आहेत. त्यामुळेदेखील पुढच्या महिन्यांतील सुट्ट्यांची (Bank Holiday In May Month) संख्या जास्त आहे. आगामी महिन्यात कामगार दिन आहे, त्यानंतर रविंद्रनाथ टागोर, नझरुल यांची जयंती आहे. अक्षय्य तृतीयादेखील आहे. त्यामुळे संपूर्ण देशात बँका साधारणपणे 11 दिवस बंद असतील.मे महिन्यात बँका एकूण अकरा दिवस बंद असल्या तरी या दिवसांत ऑनालाईन बँकिंगची सुविधा चालू असणार आहे. इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांची कामे करता येतील. काही सुट्ट्या या त्या-त्या राज्यांपुरत्या मर्यादित आहेत. त्यामुळे सुट्ट्यांच्या दिवसांत बदल होऊ शकतो. 

मे महिन्यात ‘या’ दिवशी असणार बँका बंद

1 मे -महाराष्ट्र दिन, कामगार दिन
5 मे – रविवार
8 मे – रविंद्रनाथ टागोर यांची जयंती (पश्चिम बंगाल)
10 मे –  बसव जयंती (कर्नाटक)

11 मे – दुसरा शनिवार
12 मे – रविवार
16 मे -स्टेट डे (सिक्कीम)
19 मे – रविवार
23 मे – बुद्ध पौर्णिमा
25 मे – नझरुल जयंती, चौथा शनिवार 
26 मे – रविवार