राज्याला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री, संजय राऊतांचा नवीन बॉम्ब……

उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची तोफ दिवसागणिक आग ओकत आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी शिंदे सेनाच फुटीवर असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दावोस दौऱ्यात महाराष्ट्रीतील गुंतवणुकीची चर्चा न होता महायुतीमधील भूकंपाची चर्चा अधिक रंगली. दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे गटाला भगदाड पाडण्याचा दावा केला आहे. तर आज संजय राऊत यांनी सकाळीच मोठा बॉम्ब टाकला.

राज्याला नवीन तिसरा मुख्यमंत्री मिळणार असल्याचा दावा करत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. काय म्हणाले संजय राऊत?मी हिंदुहृदयसम्राटांचा विचार नेणारा एकमेव व्यक्ती आहे असं सांगितलं जातं. मुळात बाळासाहेबांनी कुणाची लाचारी पत्करायला शिकवलं नाही, असा पलटवार राऊतांनी केला.

आज जो काही बूट चाटेपणा सुरू आहे. हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता. भ्रष्टाचार, महाराष्ट्राची लूट, महाराष्ट्राचं अध:पतन आणि उघड्या डोळ्यांनी पाहणारे लाचार राज्यकर्ते यात हे लोक सहभागी आहेत, हा जर बाळासाहेबांचा विचार आहे असं वाटत असेल तर हा महाराष्ट्र अत्यंत धोकादायक लोकांच्या हाती गेला आहे, असं मानतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.