Hit Wave Alert : या जिल्ह्याला ‘या’ तीन दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा

महाराष्ट्रातल्या तीन जिल्ह्यात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. सध्या उन्हाळा सुरु असून 10-15 मिनिट चालल्यानंतर अंग घामाने भिजून निघतय. उष्णतेमुळे अंगाची काहिली होतेय. त्यामुळे सकाळ-दुपारच्यावेळी शक्यतो लोक घराबाहेर पडण्याच टाळत आहेत. त्यात आता हवामान विभागाने पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

त्यामुळे नागरिकांनी आता जास्त काळजी घेण्याची गरज आहे. 27 ते 29 एप्रिल या तीन दिवसात तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या झळा बसतील. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आव्हान करण्यात आले आहे.मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये चक्रीय वात विरोधी स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे 27 आणि 28 एप्रिल या दोन दिवसात तापमानात वाढ होऊ शकते, असं हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी माहिती दिली आहे.

मुंबईसाठी दुसऱ्यांदा हा इशारा देण्यात आला असून याआधी 15 आणि 16 एप्रिल रोजी मुंबईमध्ये अनेक ठिकानी तापमानामध्ये वाढ जाणवली होती. नवी मुंबई सह इतर ठिकाणी तर पारा 41 अंशावर गेला होता. मुंबई, ठाणे, रायगड या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा पुन्हा इशारा दिला आहे.