गुणतालिकेत उलथापालथ! टॉप 4 मध्ये कोणाला संधी?

आयपीएल 2024 स्पर्धेतील 40 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. अतितटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने अवघ्या 4 धावांनी गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने थेट सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सला धोबीपछाड दिला आहे.

राजस्थान रॉयल्स प्लेऑफ शर्यतीत फक्त एक पाऊल दूर आहे. एका सामन्यात विजय मिळवताच राजस्थानचं प्लेऑफचं स्थान पक्कं होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स 10 गुण आणि 1.206 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबाद 10 गुण आणि 0.914 नेट रनरेटसह तिसऱ्या, लखनौ सुपर जायंट्स 10 गुण आणि 0.148 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्स 8 गुण आणि 0.415 नेट रनरेटसह पाचव्या स्थानी आहे.

दिल्ली कॅपिटल्सने आठव्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. 9 सामन्यात 4 सामने जिंकत 8 गुण आणि -0.386 नेट रनरेटसह सहाव्या स्थानी आहे. दिल्लीने मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सला धोबीपछाड दिला आहे. गुजरात टायटन्सचा संघ 8 गुण आणि -0.974 नेट रनरेटसह सातव्या स्थानी घसरण झाली आहे. मुंबई इंडियन्स 6 गुण आणि -0.227 नेट रनरेटसह आठव्या स्थानी आहे. पंजाब किंग्स 4 गुण आणि -0.292 नेट रनरेटसह नवव्या स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 2 गुण आणि -1.046 नेट रनरेटसह दहाव्या स्थानी आहे.